Protest
ProtestAgrowon

Samruddhi Mahamarg : संपादित जमिनीला बाजारभावाप्रमाणे मावेजा द्यावा

बाजारभावानुसार जमिनीचा मावेजा सरकारने द्यावा अन्यथा याहून अधिक तीव्र आंदोलन करणार आहोत.

Nanded News : नांदेड ते जालना समृद्धी महामार्गांमधील (Samruddhi Mahamarg ) संपादित होणाऱ्या जमिनीचा मावेजा बाजारभावानुसार देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी कृती समिती नांदेड, परभणी व जालना येथील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. ८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Protest) केले.

या आंदोलनाला राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, ठाकरे सेनेचे दत्ता पाटील कोकाटे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जालना-नांदेड जोडणारा महामार्ग होत आहे. या महामार्गासाठी शेतकऱ्याच्या जमिनी संपादित केला जात आहेत.

परंतु योग्य पद्धतीचा मावेजा मिळत नाही अशी तक्रार शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष दासराव हंबर्डे यांनी केली आहे. हा समृद्धी मार्ग नांदेड, जालना, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातून जात आहे.

Protest
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’चे महामार्ग

या भागात असलेल्या लोअर दूधना, सिद्धेश्वर, जायकवाडी आणि विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील अत्यंत सुपीक व उच्च उत्पादन क्षमता असलेल्या जमिनी यासाठी संपादित केल्या जात आहेत. परंतु याला योग्य पद्धतीचा भाव दिला जात नाही. असे शेतकरी कृती समितीचे म्हणणे आहे.

भूसंपादन कायदा २०१३ नुसार कलम २६ चा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी जमिनीचा भाव ठरवावा असे निर्देश आहेत. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष दासराव हंबर्डे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, दत्ता पाटील कोकाटे, जीवन पाटील घोगरे आदी उपस्थित होते.

Protest
Shetkari Melava : भारतीय किसान संघाच्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी मेळावा उत्साहात

आणखी आंदोलन तीव्र करू

बाजारभावानुसार जमिनीचा मावेजा सरकारने द्यावा अन्यथा याहून अधिक तीव्र आंदोलन करणार आहोत. नांदेड, परभणी, जालना येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अतल्पभावाने सरकार घेत आहे. हे धोरण चुकीचे आहे.

एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये १८० हेक्टर जमिनी संपादित केली जाणार आहे. तर एकूण ५०० हेक्टर जमीन संपादित केली जात आहे. परंतु बाजारभावानुसार शेतकऱ्यांना जमिनीची किंमत दिली पाहिजे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असे कृती समितीचे अध्यक्ष दसराव हंबर्डे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com