Kharif Season : खरीप हंगामात सोयाबीन लागवडीकडे कल

Cotton Crop : पुढील महिन्यात सुरु होत असलेल्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. यामध्ये सोयाबीनसह कापूस पिकाचे क्षेत्र वाढीची शक्यता अपेक्षित धरली आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Kharif Season In Akola : पुढील महिन्यात सुरु होत असलेल्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. यामध्ये सोयाबीनसह कापूस पिकाचे क्षेत्र वाढीची शक्यता अपेक्षित धरली आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा मिळण्यासाठी कृषी विभागाने तयारी चालवली आहे.

येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यात सर्वाधिक २ लाख ३३ हजार हेक्टरवर सोयाबीन लागवडीचा अंदाज आहे.

सात जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ होत असतो. मुबलक पाऊस झाल्यानंतर शेतकरी जमिनीतील ओलीचा अंदाज घेत पेरणीला प्रारंभ करीत असतात.

यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे संकेत दिले आहेत. त्यानुसार शेतकरी लवकरच बी-बियाणे, खताच्या तयारीला लागणार आहे. यासाठी कृषी विभागाने नियोजन करून ठेवले आहे. जिल्ह्यात २ लाख ३३ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड अपेक्षित धरली जात आहे.

Kharif Season
Kharif Crop Competition : राज्यस्तरीय खरीप पीक स्पर्धेचा निकाल जाहीर

यासाठी लागणाऱ्या बियाण्यात महाबीज १५ हजार क्विंटलचा पुरवठा करणार आहे. तसेच राष्ट्रीय बीज निगम एक हजार क्विंटल, कृभको ५०० क्विंटल तर कंपन्यांचे ४४ हजार ६६३ क्विंटल अशा एकूण ६१ हजार १६३ क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाने केली आहे.

कपाशीची लागवड सुद्धा गत वर्षीच्या तुलनेत अधिक होण्याची शक्यता असून कपाशीची पेरणी १ लाख ६० हजार हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांकडे बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे.

७० हजार क्विंटल बियाणे मागणी...

खरीप हंगामासाठी सोयाबीनचे ६१ हजार १६३, तूर ३ हजार ४५, मूग ३८०, उडीद ४२०, संकरित ज्वारी ३००, मका ३८, बाजरा ५ तर तिळाचे १.२ क्विंटल, संकरित कपाशी ४ हजार क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठीची मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नोंदविल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाजारातील कंपन्यांच्या बियाण्यांव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. खरीप हंगामात शेतकरी दोन लाख ९२ हजार ८६५ क्विंटल घरचे बियाणे वापरतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

Kharif Season
Kharif Season 2023 : हवामानाचा अंदाज घेऊन खरिपाचे नियोजन करावे

असे राहील खरीप क्षेत्र

पीक - क्षेत्र (हेक्टर)

सोयबीन - २ लाख ३३ हजार

संकरित कापूस - १ लाख ६० हजार

तूर - ५८ हजार

मूग - १४ हजार ४००

उडीद - १० हजार

ज्वारी - ४ हजार

मका - २५०

बाजरी - २००

तीळ - १००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com