जास्त दूध उत्पादन असलेली सहिवाल गाय

भारतात अनेक प्रकारच्या विविध गायीच्या प्रजाती पाळल्या जातात. कोणती जात पाळायची हे तिचा वापर कशासाठी करायचा आहे यावर अवलंबून असतो.
High Milk Producing Indian Sahiwal Cow
High Milk Producing Indian Sahiwal Cow

भारतात अनेक प्रकारच्या विविध गायीच्या प्रजाती पाळल्या जातात. कोणती जात पाळायची हे तिचा वापर कशासाठी करायचा आहे यावर अवलंबून असतो. या गायीचं मूळ स्थान पाकिस्तानातील साहिवाल जिल्हा असल्यानं तेथे जास्त प्रमाणात आढळून येते. आज आपण या सहिवाल गायीविषयी जाणून घेणार आहोत. या गायीचे शरीर मोठे असते, कातडी लांबलेली असल्यान तिला मुलतानी असंही म्हटल जात. छोटे डोके आणि शिंगे ही यांची वैशिष्ट्ये. या गायींचे पाय छोटे असतात आणि शेपटी लहान असते. लाल आणि भुऱ्या रंगाच्या या गायी असतात. या गायींच्या पाठीवरील खांदा हा चांगल्या उंचीचा असतो. साहिवाल गायींचे वजन ३०० ते ४०० किलो असते. सहिवाल गायीचा दूध देण्याचा कालावधी ३०० दिवस असून सरासरी दूध उत्पादन २१०० लिटर असते. त्यांचे सरासरी आयुष्य १५ वर्षांचे असते. दूध उत्पादन क्षमता १० ते १६ लिटर इतकी असते. उत्तम व्यवस्थापनात एका वेतात या गायी २२७० लिटरपर्यंत दूध देऊ शकतात.

हेही पाहा - सहिवाल : सर्वाधिक दूध देणारी देशी गाय

या गायीच्या कालवडींचे प्रथम माजावर येण्याचे वय अंदाजे ३० ते ३६ महिन्यांच्या दरम्यान असते. या गायीचे बैल मध्यम आकाराचे असतात. बैलांचा रंग गायींप्रमाणेच असतो परंतु वशिंडाजवळ काळसर गडद छटा असते. वशिंड मध्यम आकाराचे घट्ट असते. शरीराची त्वचा लोंबती असल्यानं उष्णता सहन करण्याची क्षमता सहिवालमध्ये अधिक असते. सहिवालला इतर अनेक नावानी संबोधले जाते, लांबी बार, लोला, मोन्टोगोमेरी, मुलतानी  आणि तेली अशी सहिवालची काही नावे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com