Cotton Seed Rate : बीटी कापूस बियाणे दरात केंद्राकडून मोठी वाढ

पुढील हंगामात कापूस लावावा की नाही? अशी चर्चा सध्या अनेक शेतकरी करत आहेत. त्यात सरकारनं बियाण्याचे दरवाढून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचं काम केलं.
Cotton Seed
Cotton SeedAgrowon

BT Cotton Seed : सध्याचे बीटी कापसाचे वाण (BT Cotton) कीड-रोगांना बळी पडणारं, बदलत्या वातारणात मान टाकणारं आणि उत्पादकतेच्या (Cotton Productivity) पातळीवर अपयशी ठरलं. कापसाचे भाव (Cotton Rate) दबावात असल्यानं शेतकरी संकटात असतानाच सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय.

सरकारनं शेतकऱ्यांना अद्यावत बीटी बियाणं देण्याऐवजी सरकारनं बीटी २ कापूस बियाणे दरातच वाढ केली. यामुळं शेतकऱ्यांचा कापूस लागवडीचा खर्च वाढणार आहे.

कापूस हे खरिपातील महत्वाचं नगदी पीक आहे. देशात चालू हंगामात कापसाची १२८ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. गेल्याहंगामात कापसाला चांगला दर मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी लागवड वाढवली.

राज्यातही ४३ लाख हेक्टरवर कापूस होता. राज्यातही लागवड वाढली. पण यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित दरपातळी झाली नाही. त्यामुळं शेतकरी अडचणीत आहेत.

Cotton Seed
Cotton Rate : खानदेशात कापसाच्या आवकेत वाढ

सध्या बाजारात कापसाला ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळतोय. पण घटलेलं उत्पादन, खते, किटकनाशके आणि मजुरीचा खर्च वाढला. यंदा अनेक भागात ५ क्विंटलपर्यंतच उतारा मिळाला.

वेचणीचा दर यंदा सरासरी १२ ते १५ रुपये किलोपर्यंत गेला. म्हणजेच सध्या मिळणाऱ्या दरापैकी २० ते २५ टक्के खर्च फक्त वेचणीवर झाला. उत्पादन घटलं पण खर्च चुकलेला नाही. सध्याच्या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आला.

दरात अशी झाली वाढ

पुढील हंगामात कापूस लावावा की नाही? अशी चर्चा सध्या अनेक शेतकरी करत आहेत. त्यात सरकारनं बियाण्याचे दरवाढून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचं काम केलं. सरकारनं काल अधिसूचना काढून बीटी कापूस बियाणे दरात वाढ केली.

सराकरनं ४७५ ग्रॅमच्या पाकीटाच्या दरात यंदा तब्बल ४३ रुपयांची वाढ केली. आता बियाण्याचे पाकीटाचा भाव ८५३ रुपयांवर गेला आहे. यापुर्वी हा भाव ८१० रुपयांवर होता.

एकरी खर्च वाढला

एक एकर कापूस लागवडीसाठी दोन पाकिटांची गरज असते. पण दिवसेंदिवस एकरी उत्पादता घटत आहे. कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढला. त्यातच आता बियाणे दरवाढीचा बोजा पडणार.

एकीकडे उत्पादन घटूनही भाव नाही आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी सरकार दरवाढ करत सुटलंय. त्यामुळं शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

Cotton Seed
Cotton Market : कापूस दर केवळ आवक वाढल्याने नरमले का?
सध्या बियाण्याचा उतारा येत नाही. हे वाण कीड-रोगांना बळी पडतंय. त्यामुळं खर्च वाढला. त्यातच कापसाला भाव नाही. सरकारनं दर आणखी भाव घ्यावा पण अद्यावत, चांगला उतारा असलेलं वाण शेतकऱ्यांना द्यावं.
अशोक निलावर, शेतकरी, अर्णी, जि. यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com