Cotton Market : वायद्यांमध्ये कापूस दरात सुधारणा

Cotton Bajarbhav : कापसाचे भाव गेले दोन महिने दबावात होते. दरात सतत नरमाई होती. वायदे किंवा बाजार समित्यांमधील दरात सुधारणा नव्हती.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Cotton Rate Update : कापसाचे भाव गेले दोन महिने दबावात होते. दरात सतत नरमाई होती. वायदे किंवा बाजार समित्यांमधील दरात सुधारणा नव्हती. पण वायद्यांमध्ये कापूस दरात आज वाढ पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये अडीच टक्क्यांची वाढ झाली.

तर सायंकाळपर्यंत वाढीचा ट्रेंड कायम होता. देशातील वायदेही खंडीमागं १६० रुपयांनी वाढले होते. पण बाजार समित्यांमध्ये म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणारे दर कायम होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाच्या दरात जवळपास अडीच टक्क्यांची सुधारणा दिसली. तर मागील दोन दिवसांमध्ये कापसाचे वायदे जवळपास ५ सेंट प्रतिपाऊंडने वाढले. रुपयात सांगायचं झालं तर कापूस वायद्यांमध्ये क्विंटलमागं ३०० रुपयांची सुधारणा झाली.

कापसाचे वायदे आज सायंकाळपर्यंत ८३.७७ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसू वायद्यांनी तब्बल एक महिन्यानंतर ८३ सेंटचा टप्पा गाठला. कापसाचे दर गेले महिनाभर दबावातच होते. सायंकाळपर्यंत कापूस वायद्यांमधील सुधारणा कायम होती.

Cotton Market
Cotton Farming : कपाशीत आंतरपीक पद्धतीचा अवलंब करा

देशातील वायद्यांमध्येही कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली. कापसाचे वायदे खंडीमागं १६० रुपयाने सुधारले होते. वायदे सायंकाळपर्यंत ६३ हजार २४० रुपयांवर पोचले होते. देशातील वायद्यांनी ही दरपातळी एक महिन्यानंतर गाठली. दरात चढ उतार होत राहीले.

पण सरासरी दरपातळी या प्रमाणात वाढली नव्हती. आठवडाभरात वायद्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस व्यवहार होत असतात. शुक्रवार हा आठवड्याचा व्यवहाराचा शेवटचा दिवस असतो. त्यामुळं शुक्रवारी बाजारात मोठ्या घडामोडी पाहायला मिळातात. दरात मोठे चढ उतार होतात. याचा अनुभव आंतरराष्ट्रीय आणि देशातील बाजारात आला.

बाजार समित्यांमध्ये म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरात मात्र सुधारणा झाली नाही. काही बाजारांमध्ये दरात चढ उतार दिसले. पण सरासरी दरपातळी आजही कायम होती.

आज कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये भाव मिळाला. याचाच अर्थ असा की वायद्यांमधील दरवाढीचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावर दिसला नाही. तर बाजारातील कापूस आवक आजही एक लाख गाठींपेक्षा अधिक होती, असं व्यापारी आणि उद्योगांच्या वतीनं सांगण्यात आलं.

किती आवक झाली?

बाजारात सध्या आवक वाढलेली आहे. उद्योगांना गरजेप्रमाणं कापूस मिळतोय. त्यामुळं आवकेचा दबाव असेपर्यंत कापूस दरात तेजीची शक्यता दिसत नसल्याचं जाणकारांनी सांगितलं. देशात मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये विक्रमी आवक झाली.

पहिल्यांदा बाजारात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक आवक दिसत आहे. एरव्ही मार्चनंतर बाजारात कापूस येत नाही. पण यंदा सर्वाधिक कापूस मार्चनंतरच बाजारात आला. एकट्या एप्रिल महिन्यात ५१ लाख गाठींच्या दरम्यान कापूस आल्याचं उद्योगांनी स्पष्ट केलं.

Cotton Market
Cotton Market : खानदेशात कापूस दरावर दबाव कायम

कारण काय?

मे महिन्यातही कापसाच्या भावावर दबाव येण्यासाठी दोन महत्वाची कारणं दिली जातात. त्यात वाढलेली आवक हे एक कारण दिलं जातं. बाजारात आवक जास्त दिसते. त्यामुळं याला सर्वजण सहमत आहेत. दुसरं कारण उद्योगांकडून दिले जातं.

उद्योगांच्या मते सूत आणि कापडाला मागणी नाही. उद्योग तोट्यात काम करत आहेत, अशी ओरड सुरु आहे. पण खूद्द उद्योगांच्या काही संघटना आणि जाणकारांच्या मते सध्या उद्योगांना तोट होत नाही. उद्योग फायद्यात काम करत आहेत.

आवक जास्तच राहील का?

म्हणजेच बाजारातील आवक जास्त असल्यामुळंच कापूस दर दबावात आहेत. उद्योगांच्या मते बाजारात पुढील महिन्यापर्यंत कापूस येईल. पण बाजारातील कापूस आवकेची गती पाहता लवकरच आवक कमी होईल. कारण उद्योग सांगतात त्याप्रमाणं शेतकऱ्यांकडं ७० ते ७५ लाख गाठी कापूस असण्याची शक्यता खूपच कमी आहे.

सध्या बाजारात ज्या प्रामाणात आवक होते, एवढी आवक डिसेंबरच्या दरम्यान होत असते. त्यामुळं आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर कापूस दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com