
Chana Market News : मागील काही महिन्यांपासून काबुली हरभऱ्याचे (Kabuli Chana Rate) भाव तेजीत आहेत. आता देशातील बाजारात नवा काबुली हरभरा (Kabuli Chana) दाखल होत आहे. पुढील महिनाभरात आवकेचा (Chana Arrival) दबाव वाढेल.
मात्र काबुली हरभऱ्याला देशांतर्गत बाजारात आणि निर्यातीसाठी (Chana Export) मागणी आहे. त्यामुळं दर तेजीत राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून काबुली हरभऱ्याचे भाव तेजीत आहेत. निर्यातीसाठी वाढती मागणी आणि देशातील कमी उपलब्धता यामुळे काबुली हरभरा भाव तेजीत आहेत.
आखाती देशांसह तर्की आणि अल्जेरियातून भारताच्या काबुली हरभऱ्याला मोठी मागणी राहीली. तसेच आता देशातील लग्न सराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळं मागणी मजबूत होती.
आता देशातील काबुली हरभरा काढणीच्या टप्प्यात आला. काही बाजारांमध्ये आवकही सुरु झाली. पुढील महिनाभरात काबुली हरभरा आवक वाढेल. त्यामुळं दरावर काहीसा दबाव येऊ शकतो. पण हा दबाव जास्त काळ नसेल.
फेब्रुवारी महिन्यात काबुली हरभऱ्याची बाजारातील आवक ५० हजार ते ७० हजार टनांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
मागणी मजबूत राहणार
बाजारात नवा काबुली हरभरा दाखल होत असला तरी मागणी आहे. सध्या पुरवठा साखळीत काबुली हरभऱ्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे काबुली हरभऱ्याची खरेदी चांगली राहू शकते.
तर निर्यातदारांनी आखाती देश, तर्की आणि अल्जेरियाला मार्च महिन्यात निर्यातीचे सौदे केले आहेत. या निर्यातदारांची खरेदी याच महिन्यात होईल. त्यामुळं दर टिकून राहण्याचा अंदाज आहे.
तुर्कीही भारताकडून खरेदी करणार
तुर्कीही यंदा भारताकडून काबुली हरभरा खरेदी करु शकतो. कारण तुर्कीला काबुली हरभरा पुरवणाऱ्या मेक्सिकोत यंदा उत्पादनात मोठी घट आली आहे. मागील हंगामात मेक्सिको देशात १ लाख ३० हजार टन काबुली हरभरा उत्पादन झाले होते.
पण यंदा उत्पादनात जवळपास ५० टक्के घट येण्याची शक्यता आहे. त्यातच मेक्सिकोचा नवा काबुली हरभरा एप्रिल महिन्यात बाजारात येईल. त्यामुळे तुर्की भारताकडून काबुली हरभरा खरेदी करणार आहे. याचा आधारही नव्या मालाला मिळणार आहे.
काय आहेत दर ?
देशातून काबुली हरभरा निर्यातीचे सौदे वेगाने झाले. मार्च डिलिवहरीसाठी काबुली हरभऱ्याचे व्यवहार १० हजार ६०० रुपये ते १० हजार ७०० रुपयांच्या दरम्यान झाले. तर सध्या बाजारात येणाऱ्या मालात १७ टक्क्यांपर्यंत ओलावा येत आहे.
या काबुली हरभऱ्याला सध्या १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. यंदा काबुली हरभऱ्याची दरपातळी याच दरम्यान राहू शकते, असा अंदाज हरभरा बाजरातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.