दुधातील भेसळ रोखण्यासाठी दुसऱ्या श्वेत क्रांतीची गरज

दूध उत्पादनातील वाढीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आज भारत जगातील प्रमुख दूध उत्पादक देशांमध्ये मोडल्या जातो. उत्पादनाबाबत स्वयंपूर्ण झालेल्या भारतासमोर दुधातील भेसळ आणि त्याचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम ही मोठी समस्या आहे.
Milk Adulteration
Milk Adulteration

भारतात १९७० च्या दशकात दूध उत्पादनातील वाढीच्या वाटचालीचा उल्लेख आपल्याकडे 'श्वेत क्रांती' (White Revolution) असा करण्यात येतो. दूध उत्पादनातील (Milk Production) वाढीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आज भारत जगातील प्रमुख दूध उत्पादक देशांमध्ये मोडल्या जातो. उत्पादनाबाबत स्वयंपूर्ण झालेल्या भारतासमोर दुधातील भेसळ (Milk Adultration) आणि त्याचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम ही मोठी समस्या आहे.

दुधातील भेसळीमुळे आरोग्यावर (Adulteration Effect On Human Health) होणारे दुष्परिणाम हे भारतासमोरील मोठे आव्हान आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Heath Organization) भारताला याबाबत सूचनावजा इशारा दिला आहे. दुधात होणाऱ्या भेसळीमुळे २०२५ पर्यंत देशातील ८७ टक्के नागरिकांना कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला आहे.  दूध हा भारतीय खाद्य संस्कृतीमधील , धर्म आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील अविभाज्य घटक आहे.  हाडे, मानसिक आजार आणि निद्रानाशासाठी उपचार गुणधर्मांसह वैदीक काळापासून आजपर्यंत दुधाला नेहमीच परिपूर्ण अन्न मानण्यात आले आहे.

दूध भेसळीसाठी जन्मठेपेची शिक्षा -

दूधभेसळ (Milk Adulteration) रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना कठोर कायदेशीर तरतुदी करण्याच्या सूचना केल्या आहेत. भेसळयुक्त दुधाचे उत्पादन आणि विपणन या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा देण्यात यायला हवी, अशी शिफारस न्यायालयाने केली आहे. सध्या अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांतर्गत गुन्हेगारांना जास्तीत जास्त सहा महिन्यांची शिक्षेची तरतूद आहे. अजूनही बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रँडेड किंवा खुल्या दुधापैकी ७९ टक्के दूध भेसळयुक्त असल्याचे भारतीय ग्राहक मार्गदर्शक सोसायटीच्या (CGSI) ताज्या वार्षिक अहवालात आढळून आले आहे.  

दुधामध्ये युरिया, फॉर्मेलिन, पेंट आणि डिटर्जेंट सारखे विषारी पदार्थांची भेसळ केली जाते. यामुळे ग्राहकांसोबतच शेतकरी आणि दूध उत्पादकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या संदर्भात जलद चौकशी आणि भेसळीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com