रशिया युक्रेन संघर्षामुळे चहा निर्यातदारांची लिलावाकडे पाठ

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे व्यापारात अनिश्चिततेचे वातावरण असून त्यामुळे चहा निर्यातदारही धास्तावले आहेत. बहुतांशी निर्यातदारांनी कुन्नूर टी ट्रेड असोसिएशनच्या दहाव्या लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे.
Tea Export
Tea Export

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukrain War) व्यापारात अनिश्चिततेचे वातावरण असून त्यामुळे चहा निर्यातदारही (Tea Exporter) धास्तावले आहेत. बहुतांशी निर्यातदारांनी कुन्नूर टी ट्रेड असोसिएशनच्या ( Coonoor Tea Trade Association ) दहाव्या लिलाव (Auction) प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे.  बिझनेस लाईनने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

निर्यातदारांकडे रशिया, युरोप किंवा इतर कोणत्याही खरेदीदार देशांकडून मागणी (Demand For Tea) नोंदवण्यात आलेली नाही. त्यामुळेच निर्यातदार या देशांमध्ये निर्यातीची जोखीम घेत नसल्याचे दिसत आहे. ''सीटीसी चहाच्या लिलावातही निर्यातीसाठी अपेक्षित खरेदी झालेली नाही. इतर लिलावामध्येही निवडक व्यवहार झाले आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत बहुतांश लॉटमध्ये दर १० रुपये प्रति किलोपर्यंत घसरले होते. तरीही निर्यातीसाठी खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांनी लिलावाकडे पाठ फिरवली असल्याचं  पॅरामाउंट टी मार्केटिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष रविचंद्रन ब्रूस यांनी सांगितलंय.

ऑफरच्या ३४ टक्केही ग्राहक नसल्याने ५.८९ कोटी रुपयांचा चहा विकल्या गेला नाही. त्यामुळे उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अलिकडच्या अनेक आठवड्यात विक्री न झालेल्या चहाचा हा उच्चांकी आकडा होता. त्यामुळे चहाचे सरासरी दर ९३.४९ रुपये प्रति किलोपर्यंत घसरले आहेत. निर्यातीसाठी खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांनी पाठ फिरवली असली तरीही देशांतर्गत खरेदीदारांनी दिलेल्या प्रतिसादामुळे बाजाराता काही हालचाल दिसून आली आहे. हिवाळ्यातील लागवड बंद असल्याने उत्तर भारतातील चहा मोठ्या प्रमाणात बाजारात येण्याची शक्यता नाही. त्यामुळे दिल्ली, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब आणि अगदी कर्नाटकातील व्यापारी दक्षिण भारतीय चहाला पसंती देण्याचा अंदाज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com