देशात साखर उत्पादनात ५.६ टक्क्यांची वाढ

यंदाच्या साखर हंगामात देशातील साखर उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत ५.६ टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती इंडीयन शुगर मिल्स असोसिएशन म्हणजेच इस्मानेदिली आहे.
Sugar export
Sugar export

यंदाच्या साखर हंगामात देशातील साखर उत्पादन (Sugar Export) मागील हंगामाच्या तुलनेत ५.६ टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती इंडीयन शुगर मिल्स असोसिएशन (Indian Sugar Mills Association) म्हणजेच इस्माने (ISMA) दिली आहे. देशात ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ५०७ साखर कारखान्यांचे (Sugar Mills) गाळप सुरू असून त्यांनी १८७.०८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. मागील वर्षी याच कालावधित सुरू असलेल्या ४९१ कारखान्यांनी १७७.०६ लाख टन साखर उत्पादित केली होती. म्हणजेच मागील हंगामाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन १०.०२ टक्क्यांनी जास्त आहे.   महाराष्ट्र आघाडीवर - महाराष्ट्राचा (Mahatarashtra) विचार केल्यास चालू हंगामात ३१ जानेवारीपर्यंत ७२.९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षी झालेल्या ६३.८० लाख टनांच्या तुलनेत यंदा ९.१० लाख टनांनी उत्पादन जास्त आहे. राज्यात चालू साखर हंगामात (Sugar season) १९४ साखर कारखाने कार्यान्वित असून मागील वर्षी याच कालावधित १८२ कारखाने चालू होते.

हेही वाचा -  बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत ५२ टक्क्यांची वाढ साखर उत्पादनात महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सध्या १२० कारखान्यांचे गाळप सुरू असून त्यामधून ५०.३३ लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. मागील वर्षीच्या झालेल्या ५४.४३ लाख टनांच्या तुलनेत यंदा साखर ४.१० लाख टनांनी उत्पादन कमी आहे. तर कर्नाटकमध्ये (Karnatak) ७२ कारखाने सुरू असून ३८.७८ लाख साखर उत्पादन झाले आहे. मागील वर्षी उत्पादित झालेल्या ३४.५४ लाख टनांच्या तुलनेत यंदा उत्पादन ४.२४ लाख टनांनी जास्त आहे.  

२०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये (Budget) साखर उद्योगासाठी चार हजार ३३७ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यात दोन हजार ५०७ कोटींच्या वाढीसह ६ हजार ८४४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करत साखर उद्योगासाठी हा सकारात्मक निर्णय असल्याचे इस्माने म्हटले आहे. देशात इथेनॉल मिश्रणाला (Ethanol Blending) प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १६० कोटी रुपयांची तरतूद केली होती. २०२२-२३ अर्थसंकल्पात इथेनॉल उत्पादन (Ethanol Production) क्षमता वाढविण्यासाठी यामध्ये अजून ३०० कोटी रुपयांच्या वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा देशात अधिक प्रमाणात इथेनॉल प्रकल्प उभारण्यास चालना मिळेल. ज्यामुळे अतिरिक्त साखर साठा कमी होण्यास मदत होईल आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यासाठी इथेनॉलचा पुरवठा वाढेल. ज्यामुळे इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यासह परकीय चलनात बचत होईल, असे इस्माने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com